---Advertisement---

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, फुटले तिन्ही टायर

---Advertisement---

मुंबई : मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. केरळमधील कोची हून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे झालेल्या या अपघातात विमानाचे तिन्ही टायर फुटले असून, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे एअर इंडियाचे विमान लँडिंग करणे खूपच आव्हानात्मक होते. परिणामी एअर इंडियाचे विमान AI2744 धावपट्टीवरून घसरले. या अपघातात विमानाचे तिन्ही टायर फुटले असून, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एअर इंडियाने या घटनेबद्दल सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. २१ जुलैला कोची हून मुंबईला जाणारे विमान AI2744 मुंबई विमानतळावर लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचले, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पुढील तपासासाठी विमान थांबवण्यात आले आहे.

मुंबई विमानतळानेही जारी केले निवेदन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नेही या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. CSMIA ने म्हटले आहे की, ‘२१ जुलैला सकाळी ९:२७ वाजता, कोचीहून येणारे एक विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना घसरले. घटनेनंतर लगेचच, CSMIA चे आपत्कालीन प्रतिसाद पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सर्व प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना विमानातून ताबडतोब बाहेर काढण्यात आले. ते सर्व सुरक्षित आहेत.

मुख्य धावपट्टी ०९/२७ ला किरकोळ नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. कामकाज सुरू राहावे यासाठी, दुय्यम धावपट्टी १४/३२ सक्रिय करण्यात आली आहे. CSMIA मध्ये सुरक्षितता ही नेहमीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---