तरुण भारत लाईव्ह । मुंबई : काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या, हे सांगू असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत. काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं.
काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी १५० हून जास्त बैठका झाल्याचं म्हटलं होतं. त्याचा दाखला अजित पवार यांनी कालच्या भाषणात दिला. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी एवढ्या बैठका घेतल्या? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. त्याबाबत गुलाबराव पाटलांना विचारलं असता त्यांनी हा दावा केला आहे.
काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या, हे सांगू असं गुलाबराव पाटील म्हणालेत.