मुंबई : एमईटी येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत. यावेळी त्यांनी ही वेळ आपल्यावर का आली. मी काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो घडलो . साहेब आमचे श्रद्धस्थान आहेत. आपण एखादा पक्ष का स्थापण करतो, लोकांना न्याय देण्यासाठी असेही अजित पवार म्हणाले.
मला २००४ साली एवढं मोठ महत्तवाच स्थान नव्हत. आम्ही कुणी कामात कमी आहोत का? कोणाचा आदर करायला कमी आहोत का? जनतेची हीच अपेक्षा असते की आमच्या लोकप्रतिनिधींनी काम करावं आणि मी तसचं काम करणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या बैठकीला ३२ आमदार पोहचले आहे तर शरद पवारांच्या बैठकीला १६ आमदार पोचल्याचे सूत्रानुसार माहिती समोर येत आहे.