राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही जनसन्मान यात्रा सुरु आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या अहवालाने खळबळ उडालीय.
गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, अजित पवार यांच्या जीवाला धोका आहे. गुप्तचर विभागाने त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जिथे महिलांची मोठी गर्दी असते, तिथे जाऊ नका असे त्यांना सांगण्यात आले आहे.
अजित पवार म्हणाले की, गुप्तचर विभागाने मला सांगितले आहे की, मी मालेगाव, धुळे सारख्या ठिकाणी गेलो तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र राज्यातील बहिणींनी मला राखी बांधली आहे. जोपर्यंत राख्या या हातावर आहेत, तोपर्यंत मला कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचे रक्षण आणि तुमच्या प्रेमामुळे मला कोणताही धोका स्पर्श करू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही गरीब महिलांसाठी योजना आणत आहोत, मात्र विरोधक विरोध करत आहेत. सरकारमध्ये असताना त्यांना कोणी रोखले ? आम्ही सरकारमध्ये येताच गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी योजना आणल्या. आता १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. मला महिलांना सांगायचे आहे की तुम्ही आम्हाला भाऊ बनवा आणि राखी बांधा, हा भाऊ तुमचा आधार बनेल.
लाडली बहीण योजनेसंदर्भ माहिती देत ते म्हणाले की, 17 ऑगस्ट रोजी तुम्ही दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. या योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळणार आहे. 17 रोजी दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. सरकारच्या या योजनेमुळे माता-भगिनींना बळ मिळणार आहे.