मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज पुण्यात भेट झाली. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.
त्यानंतर अजित पवार आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. अजित पवार यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यानंतर दिल्लीत आणखी काही महत्त्वाच्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार आता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत.
प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी काही वकील देखील दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी खासदार सुनील तटकरे हे देखील आहेत. तीनही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरु आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोडी घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.