Politics maharashtra : राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे धाराशिवमध्ये भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार बंडखोरी करणार असल्यापासून ते त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे दिल्याच्या चर्चांमुळे ते सध्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारच भावी मुख्यमंत्री असल्याचं दाखवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुणे, धाराशीवनंतर राजधानी मुंबईतही अजित पवारांचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर शरद पवारांना विचारण्यात आलं असता, हा वेडेपणा करु नका असं अजित पवारांनीच सांगितलं आहे असं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.