जालना : राज्य सरकारने गुढी पाडवा ते आंबेडकर जयंतीपर्यंत गरिबांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
काय म्हणले अजित पवार?
गुढी पाडव्यापासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा देणार आहेत. कसला आनंद? तुम्ही तिथे आनंद घेताय आणि आनंद शिधा… आनंद शिधा.., सुरू केलंय. देतात किती एक किलो. घरात माणसं किती पाच. एक किलो आनंदाचा शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
जालन्यातील घनसावंगी येथे तिर्थपुरीमध्ये इथेनॉल प्रकल्पाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.