पक्षाच्या शिबीर पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब!

मुंबई : शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे शिबीर पार पडणार आहे. मात्र, या शिबीराच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांच्या नावाचा उल्लेख कुठेही नाही. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. या शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे २००० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. परंतु, अजित पवार शिबीराला अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार शिबीराऐवजी पिंपरी-चिंचवडला जाणार असल्याचे समजत आहे. याआधीही अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात सहभागी होणार होते. मात्र, त्यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता पुन्हा पवार शिबिर सोडुन पिंपरी-चिंचवडला जाणार आहेत. यामुळे पवारांची नाराजी कायम आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.