---Advertisement---

पवारांच्या प्रेसला अजित पवारांची दांडी

---Advertisement---

मुंबई : राजीनाम्याच्या घोषणेसाठी सर्वात आघाडीवर असणारे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा सस्पेन्स निर्माण केला आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात पवार यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणे अपेक्षित असताना अजितदादांनी गैरहजेरी लावल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी जयंत पाटील यांचा ताफा पोहोचेपर्यंत पत्रकार परिषद सुरू केली नाही.

मात्र, यावेळी अजित पवारांची अनुपस्थिती सर्वांना जाणवू लागली होती. यापूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी हजेरी लावली होती. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अजित पवार पुन्हा मंचावर दिसले नसल्याने पुन्हा ते नाराज आहेत का, या चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. दरम्यान, शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. दिवसभरापासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने लिहीलेली पत्र पवारांना सुपूर्द केले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---