---Advertisement---

‘अजमेर 92’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

---Advertisement---

नवी दिल्ली : बहुचर्चित ‘अजमेर 92’ (Ajmer 92) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थक्क करणारा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘अजमेर 92’च्या ट्रेलरमध्ये 1992 दरम्यान राजस्थानमधील महिलांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. तरुण मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत कसं लैंगिक शोषण केलं जातं. त्यामुळे त्यांचे पालक कसे हतबल होतात. याचं चित्रण ‘अजमेर 92’च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

येत्या 21 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अजमेर 92’ या सिनेमात करण वर्मा, राजेश शर्मा, अल्का अमीम, मनोज जोशी, शालिनी कपूर आणि जरीना बहाब हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अंगावर शहारे आणणाऱ्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. ‘अजमेर 92’ हा प्रोपगंडा सिनेमा असल्याचे या सिनेमाचे दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह यांनी नाकारले असून हा सिनेमात सत्य घटनेवर आधारित असल्याचा त्यांचा दावा आहे.

पुष्पेंद्र सिंह म्हणाले, अजमेर 92 संदर्भात आम्ही खूप रिसर्च केला आहे. काही पीडीतांना भेटून वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. सिनेमाला विरोध करणाऱ्यांनी आधी सिनेमा पाहावा आणि मगच आपले मत मांडावे. गुन्ह्याकडे केवळ गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. शेकडो मुलींसोबत झालेलं गैरवर्तन लोकांसमोर मांडणं आणि घटनेबद्दल लोकांना माहिती द्यावी हाच या सिनेमाचा उद्देश आहे”.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment