तरुण भारत लाईव्ह । १७ एप्रिल २०२३। सध्या काही अशुभ योगांची स्थिती आहे. त्यात काही शुभ योगही घडणार आहे. 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. यामुळे शुभ समजला जाणारा अखंड साम्राज्य राजयोग तयार होत आहे. या स्थितीचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक फायदा होईल. तर कोणत्या आहेत त्या तीन राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मिथुन रास
अखंड साम्राज्य योग मिथुन राशीच्या जातकांना फलदायी ठरू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. त्यामुळे आर्थिक अडचण दूर झाल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. एक वर्षात तुमचं उत्पन्न दुपटीने वाढेल अशी स्थिती आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील.
सिंह रास
या राशीच्या जातकांनाही अखंड साम्राज्य योगाचा फायदा होईल. कारण गुरु ग्रह एका वर्षासाठी या राशीच्या भाग्य स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम राहील.
मकर रास
या राशीच्या चतुर्थ स्थानात गुरु गोचर करणार आहे. नोकरीच्या ठिकाणी असलेलं आनंददायी वातावरण तुमचा उत्साह वाढवेल. मित्र परिवाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यामुळे काही अडचणीची कामं झटपट उरकता येतील.