अखिल विश्व गायत्री परिवारच्या  राष्ट्रीय जनजागरण यात्रेचे बोदवडला स्वागत 

नाना पाटील / बोदवड

बोदवड :  मुंबई येथे गायत्री परिवार द्वारा २१  ते २५फेब्रुवारी  २०२४ दरम्यान अश्वमेध महायज्ञ होत असुन त्याची जनजागृती म्हणून शेगाव पासुन हि भव्य रथयात्रा २१  ऑक्टोबर पासुन निघाली असुन २२ जानेवारी २०२४ पर्यत मुंबई येथे पोहचणार आहे.

हि भव्य रथयात्रा मुक्ताईनगर वरुन बोदवड येथे आली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अँड. रविद्र  पाटील, बोदवड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आनंद पाटील यानी सपत्नीक  कलशाचे पुजन केले.  या वेळी उपस्थित बोदवड तालुका संंघचालक हरीआेमजीयानी जैस्वाल , नगरसेवक दिनेश माळी,  प्रशांत बडगुजर,  व्यापारी ऊमेश चोपडा,  शिवाजी खेलवाडे याच्यासह व्यापारी  व नागरिक उपस्थित होते . नंतर या  यात्राचे मनुर बु येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यानी  स्वागत केले.

https://fb.watch/pefpuJL6py/

विठ्ठल मंदिरासमोर मुंबई येथे होणाऱ्या अश्वमेध महायज्ञाची माहिती सांगण्यात आली . ग्रामपंचायत सरपंच पती सुभाष देवकर उपसरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य निना पाटील, राजेश पाटील, बाळु पाटील याच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.  शांन्तीकुज्ज हरिद्वार चे प्रतिनिधी गणेश चाँदवशी , रथयात्रा समन्वयक  शिवदास घागडे  गुरुजी ,अश्वमेध महायज्ञ समिती सदस्य प्रतापजी पटेरिया याच्यासह शांन्तीकुज्ज प्रतिनिधी उपस्थित होते .