Akkalkuwa Assembly Election 2024 । विजयाचा दावा कोणाचाच नाही; प्रतीक्षा निकालाची

#image_title

Akkalkuwa Assembly Election 2024 । विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता उत्सुकता आहे ती निकालाची. राज्यभरात हा निवडून येणार व तो पडणार, अशा चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, चौरंगी लढत झालेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे आता सर्वांना निकालाशीच प्रतीक्षा लागली आहे.

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मंत्री तथा आमदार ॲड. के.सी.पाडवी हे सात वेळेस विजयी झाले आहेत. यंदा त्यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर महायुतीतर्फे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यासोबतच माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देत या मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी हे देखील भारतीय आदिवासी पार्टीतर्फे रिंगणात होते. त्यामुळे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत रंगली.

मात्र, चौरंगी लढत झालेल्या या मतदारसंघात एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे आता सर्वांना निकालाशीच प्रतीक्षा लागली आहे. या मतदारसंघात चारही दिग्गज उमेदवार असल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे.