खुशखबर ! आता 70 वर्षांपुढील सर्वांचे होणार मोफत उपचार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज लोकसभेला संबोधित करताना वयस्कर लोकांसाठी एक खुशखबर दिली आहे. विशेष म्हणजे, भाजपने लोकसभा निवडणुकीआधी घोषणापत्रामध्ये याचा उल्लेख केला आहे.

काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी ?
आयुष्यमान योजनें तर्गत 70 वर्षांपुढील सर्व व्यक्तींचा मोफत उपचार होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार चांगलं काम करत आहे. शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जास्त आत्मनिर्भर केलं आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीआधी घोषणापत्रामध्ये केला उल्लेख
भाजपच्या घोषणापत्रामध्ये ७० वर्षांपुढील सर्वांना मोफत उपचार दिले जातील असं सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं.

आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करण्यात येईल आणि त्यात वृद्ध व्यक्तींना आणण्यात येईल. त्यांना मोफत आणि चांगली आरोग्य सुविधा पुरवली जाईल, असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. या योजनेची सुरुवात अरुण जेटली यांनी २०१९ मध्ये केली होती. याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं देखील म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत केले जातात.

दरम्यान, २४ जून रोजी १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. आज राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचे अभिभाषण झाले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख केला.