---Advertisement---

दुई सबस्टेशनचे काम निकृष्ट, दोषींना अधिकाऱ्यांचे अभय?

---Advertisement---

Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील सबस्टेशनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या सबस्टेशनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, याबाबत तक्रार देऊनही दोषींवर कारवाई होत नाही. दरम्यान, अधीक्षक अभियंत्यांचा या भ्रष्टाचाराला अभय असल्याचा आरोप प्रजाशक्ती क्रांती दलाचे राज्य सचिव ॲड. सतीश मोरे यांनी केला आहे.

दुई येथील भ्रष्टाचाराबाबत गेली दोन वर्षे झालीत संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव येथील अधीक्षक अभियंता यांना तक्रार अर्ज देऊन पाठपुरावा केला जात आहे. मात्र, या तक्रारीची साधी दखल देखील घेतली जात नाही. त्यामुळे अधिकारी हे जनतेसाठी काम करीत नसून ते ठेकेदारांसाठी काम करत आहे का? असा सवाल देखील सचिव ॲड. सतीश मोरे यांनी उपस्थित केला आहे. जर एखाद्या संघटनेच्या तक्रार अर्जाची महावितरणकडून दखल घेतली जात नसेल तर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या तक्रार अर्जाचे काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


दुई तालुका मुक्ताईनगर येथील सबस्टेशनच्या कामाप्रमाणेच पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील सबस्टेशनकडून दहिगावकडे टाकण्यात आलेल्या नवीन विद्युत पोलचे काम देखील अतिशय निकृष्ट आहे. याबाबतही तक्रार अर्ज देऊन ही कुठलीच कार्यवाही होत नाही. तक्रार अर्ज स्विकारण्यासाठीही अधीक्षक अभियंता हे उपस्थित नसतात त्यांच्यावतीने अभियंता खंडारे हे तक्रार वजा निवेदन स्वीकारतात. प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद असून एक प्रकारे ठेकेदारांना अधिकाऱ्यांचे अभय आहे, असा आरोप करत लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालना समोर आंदोलन करू, असा इशारा देखील ॲड. मोरे यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment