साऊथचे सुपरस्टार; अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर मतदानासाठी रांगेत

हैदराबाद : तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. 2024 लोकसभेच्या च्या दृष्टीनं ही विधानसभा निवडणूक अधिक महत्त्वाची समजली जात असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे. सकाळपासून मतदानाचा उत्साह देखील दिसून येत आहे. विशेष म्हणजे तेलुगू/ दाक्षिणात्य कलाजगतातील सुपरस्टार मंडळींनीही न चुकता हजेरी लावली. अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर मतदानासाठी रांगेत उभे होते.

टॉलिवूडमध्ये मेगास्टार अशी ओळख असणाऱ्या अभिनेता चिरंजीवी यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांची पत्नी सुरेखा आणि धाकटी मुलगी श्रीशासुद्धा त्यांच्यासोबतच होती. यावेळी चिरंजीवी यांनी रांगेत प्रतिक्षा करत त्यानंतर मतदान कक्षात जाऊन मत दिलं. तर, ‘पुष्पा’ फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुनही यावेळी मतदानाचा हक्क बजावताना दिसला.

हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथे त्यानं मतदान केलं. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसोबतच अल्लू अर्जून मतनोंदणीसाठी रांगेत उभा राहिला. त्यावेळी आपल्या रांगेत चक्क अल्लू अर्जुन उभा आहे हे पाहूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यानं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. फक्त अल्लू अर्जुनच नव्हे, तर ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्युनिअर एनटीआर, त्याची पत्नी आणि आणि आईसोबत मतदान केंद्रावर दिसला. यावेळी मतदारांच्याच रांगेत उभं राहून या मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला.