तरुण भारत लाईव्ह । १५ एप्रिल २०२३। अॅलमंड चॉकलेट्स’ घरच्या घरी बनवली जाणारी सर्वात सोपी रेसिपी आहे. बदामाचे चॉकलेट्स ही झटपट तयार होणारी स्वीट डिश असून ती आपण डेसर्ट म्हणूनही सर्व्ह करु शकतो. अॅलमंड चॉकलेट्स घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
१ कप डार्क चॉकलेट, बदाम
कृती
सर्वप्रथम डार्क चॉकलेट्स ओव्हनमध्ये ३० मिनिटे ठेवून वितळवून घ्या. आता एका बाऊलमध्ये वितळवलेले डार्क चॉकलेट घेऊन त्यात भाजून बारीक वाटलेल्या बदामांची पावडर मिक्स करा. सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिश्रण चांगलं ढवळा. तुम्ही वितळवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये पिठीसाखर टाकू शकता जेणे करुन त्याचा कडवटपणा निघून जाईल. वरील सामग्री चांगली मिक्स झाल्यानंतर मिश्रण चॉकलेट मोल्ड ट्रे मध्ये काढून घ्या आणि चॉकलेट सेट होण्यासाठी १० मिनिटे ट्रे फ्रिजमध्ये ठेवा. तयार आहेत अॅलमंड चॉकलेट्स.