मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी आलोक आराधे यांना बढती

---Advertisement---

 

नवी दिल्ली: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनूभाई पांचोली यांची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी बढती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने (न्यायवृंद) या दोघांच्या नावाची शिफारस केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर बुधवारी केंद्रीय कायदे मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

न्या. आराधे मूळचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तर न्या. पांचोली हे गुजरात उच्च न्यायालयाचे आहेत. न्या. बेला त्रिवेदी आणि न्या. सुधांशू धुलिया हे दोघे अलीकडेच निवृत्त झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दोन जागा रिक्त झाल्या होत्या. आता न्या. आराधे आणि न्या. पांचोली यांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील ३४ न्यायमूर्तीचा कोटा पूर्ण झाला आहे.

न्यायमूर्ती आराधे यांची २९ डिसेंबर २००९ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त आणि १५ फेब्रुवारी २०११ रोजी कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी तेलंगणाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून आराधे यांची सुरुवातीला जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात २०१६ मध्ये बदली झाली. तेथे त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. त्यानंतर आराधे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात बदली झाली. तेथेही त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात बदली होण्यापूर्वी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. न्या. चंद्रशेखर सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत. ते मूळचे झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. कॉलेजियमने सोमवारी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायमूर्तीना कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्तावदेखील मंजूर केला आहे. याशिवाय कॉलेजियमने देशातील विविध उच्च न्यायालयांमधील १४ न्यायमूर्तीच्या बदलीची शिफारस केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---