अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेस बुडाली, आघाडीतील नेत्याचाच हल्लाबोल

#image_title

महाराष्ट्रातील विधानसभा निडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आता आघाडीतील नेत्यांचाच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यातील पराभवाला काँग्रेसचा अतिआत्मविश्वास कारणीभूत असल्याचा मोठा दावा शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी ‘आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काँग्रेसचा अतिआत्मविश्वास असल्याचे सांगितले. काँग्रेसनेच आपला पराभव केला. प्रत्येकजण सूट घालून तयार होते, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. तसेच भविष्य डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्व 288 जागांवर ताकद लावणार असल्याचेही ते म्हणाले.

भविष्य डोळ्यासमोर ठेऊन आपण सर्व 288 जागांवर निवडणूक लढवली नाही तरी भविष्यात आपण बळकट करू, अशी भावना पक्षप्रमुखांकडे व्यक्त केली आहे. जागा महामंडळाच्या निवडणुका अजून दूर आहेत, मात्र पक्ष संघटन मजबूत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीतील पराभवानंतर मातोश्रीवर बोलावलेल्या सभेत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, असेही दानवे म्हणाले.