धक्कादायक! फक्त सीमाच नव्हे तर, तिच्या १३ वर्षीय मुलीवरही होता राहुलचा ‘डोळा’

अंबरनाथ : अनैतिक संबंधातून सीमा कांबळे (३५) या महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काल, ३ रोजी अंबरनाथ पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या ब्रीजवर घडली होती. दरम्यान, आता या प्रकरणाला नवे वळण आले आहे.

पोलीस तपासानुसार, मयत सीमा कांबळे (३५) आणि आरोपी राहुल भिंगारकर (२९) यांचे प्रेमसंबंध होते. सीमा कांबळे ही विवाहित होती मात्र, ती पतीपासून विभक्त राहत होती. तिचे आणि राहुलचे प्रेमसंबंध संबंध होते आणि त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाणही झाली होती. सीमाने राहुलला हात उसने पैसे दिले होते. मात्र, पैसे परत करण्यास राहुल टाळाटाळ करत होता.

हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण

सीमा सतत त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती आणि पर्यायी मार्ग म्हणून लग्न करण्याची मागणी करत होती. ‘पैसे दे नाहीतर लग्न कर’ असा दबाव ती राहुलवर टाकत होती. यामुळे दोघांमध्ये वाद वाढत चालला होता.

सोमवार, ३ रोजी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवर सीमा आणि राहुल यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि संतप्त झालेल्या राहुलने धारदार शस्त्राने सीमावर हल्ला केला. रक्तबंबाळ झालेल्या सीमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भरदिवसा घडल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आता या प्रकरणाला नवे वळण आले आहे.

सीमाच नव्हे तर, तिच्या १३ वर्षीय मुलीवरही होता राहुलचा ‘डोळा’

पोलीस तपासानुसार, आरोपी राहुल भिंगारकर (२९) आणि मयत सीमा कांबळे (३५) यांच्यात सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षांच्या मुलीवरदेखील होता. याशिवाय सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.