---Advertisement---
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेली १०८ रुग्णवाहिका तीन महिन्यापासून ब्राह्मणशेवगे पंचक्रोशीतील रुग्णसेवा वाऱ्यावर सोडून चोपडा येथे रुग्णसेवेसाठी पाठवण्यात आली होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच ही रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आली आहे.
शिरसगाव ही रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा आणावी, यासाठी सोमनाथ माळी व परिसरातील नागरिक प्रयत्न करत होते. परंतु याकडे कानाडोळा केला जात होता. सर्पदंश झाल्याने उर्मिला राजेंद्र देसले या ब्राह्मणशेवगे येथील महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने जीव गमवावा लागला.
यासंदर्भातील वृत्त बुधवारी प्रकाशित झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. ही रुग्णवाहिका लागलीच चोपड्याहन शिरसगाव येथील शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी दुपारी तीन महिन्यांपासून गायब झालेली रुग्णवाहिका अखेर दाखल झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तासाच्या आत बुधवारी दुपारी दाखल झाली, आरोग्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु दुसरीकडे अशा पद्धतीने सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ चालू आहे. उर्मिला राजेंद्र देसले महिलेला आरोग्य व्यवस्थेच्या अशा नाकर्तेपणामुळे दोन मुलींना पोरके करत नाहक जीव गमवावा लागला आहे.