नवी दिल्ली : अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भाजपचे कौतूक करत भाजप हा जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष असल्याचे म्हटले आहे. २०१४, २०१९ मधील विजयानंतर २०२४ मध्ये भाजप पुन्हा एकदा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. आगामी काळात भाजप भारतात वेगाने आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असेही वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिध्द झालेल्या लेखात म्हटले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या लेखात म्हटले आहे की, भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत असून अमेरिकेच्या दृष्टिनेही भाजप हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे. अमेरिका भारताच्या मदतीशिवाय चीनचा सामना करू शकत नाही, असेही लेखात म्हटले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन विजय मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्ष २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीत सलग तिसर्यांदा विजयाकडे कूच करत आहे.
४३ वर्षांतील भाजपचा विस्तार
१९८१ मध्ये संपूर्ण देशात भाजपचे केवळ १४८ आमदार होते, आज त्यांची संख्या १२९६ एवढी झाली आहे.
१९८४ मध्ये भाजपचे केवळ दोन खासदार होते, आज हा आकडा ३०३ वर गेला आहे.
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १.८९ कोटी मते मिळाली होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२.८९ कोटी मते मिळाली आहेत.
भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे १७ कोटींहून अधिक कार्यकर्ते आहेत. तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडे ९.१४ कोटी कार्यकर्ते आहेत.