Amit Shah । उद्धवजी…, आरोपांची सरबत्ती करत उद्धव ठाकरेंना डिवचले, वाचा काय म्हणाले ?

#image_title

Amit Shah । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रविवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी ‘मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे की ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी दोन चांगले शब्द बोलण्यास सांगू शकतात का ? असे म्हणत उद्धव ठाकरेंना टार्गेट केले.

काय म्हणाले अमित शाह ?
शाह म्हणाले की, मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे की ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी दोन चांगले शब्द बोलण्यास सांगू शकतात का ? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगली शब्द बोलू शकतो का ? विरोधाभासांतून आघाडीचे सरकार स्थापनेचे स्वप्न उराशी बाळगून बाहेर पडलेल्यांना महाराष्ट्रातील जनतेने ओळखले तर बरे होईल. 370 हटवण्यास विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे बसले आहेत, असे म्हणत शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला हाणला.

“मी उद्धव ठाकरेंना काही सांगतो. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा. तो तुमचा प्रश्न. पण तुम्ही कुठे बसला आहेत ते सांगतो. तुम्ही ३७० कलमाला विरोध करण्याऱ्यांसोबत बसला आहात. तुम्ही रामजन्मभूमीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. सावकरकरांसाठी अपशब्द वापरणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात.” अशी एकामागून एक आरोपांची सरबत्ती करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले.

काँग्रेसवर जोरदार टीका
या देशात ३७० कलम संपेल कुणाला वाटत नव्हतं, ट्रिपल तलाक संपेल कोणीच मानत नव्हत, सीएए येईल कुणालाही वाटलं नव्हतं. राम मंदिर उभारलं जाईल हे कुणालाही वाटलं नव्हतं. पण आम्ही करून दाखवलं. दलित आदिवासी आणि ओबीसींचं आरक्षण घेऊन मुस्लिमांना द्यायला महाराष्ट्र तयार आहे का. आपल्या संविधानात धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नाही. काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वीच हे आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनाही वचन द्याल तर विचारपूर्वक करा, असं सांगावं लागतं. पण आमचं तसं नाही. कर्नाटक, हिमाचल असो अनेक ठिकाणी काँग्रेस आश्वासनापासून दूर गेली आहे. पण युतीच्या आश्वासनावर देशाचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.