विरोधकांवरील ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवर अमित शाह म्हणाले…

नवी दिल्ली : विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी आणि सीबीआयमार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. राजकीय सूडबुद्धीने या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जातो. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. अमित शाहांच्या एका विधानाने विरोधकांच्या आरोपांमधील हवा निघून गेली आहे.

‘इंडिया टुडे’ने आयोजित करण्यात आलेल्या कॉनक्लेवमध्ये अमित शाह बोलत होते. विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमित शाह म्हणाले, २०१७ साली उत्तरप्रदेशच्या निवडणुका होत्या. तेव्हा काँग्रेसची एक महिला नेता म्हणाली, आम्ही भ्रष्टाचार केला आहे, तर कारवाया का? केल्या जात नाहीत. त्यांनी आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता कारवाया केल्या जात असून, ओरडत आहेत.

कोणत्याही तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटीशीला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता. तसेच, कोणत्याही एफआयआर आणि चार्जशीटलाही न्यायालयात आव्हान देता येत. त्यामुळे न्यायालयात जाण्याऐवजी ओरडून काय फायदा, असा टोला अमित शाहांनी लगावला आहे. आता जे ओरडत आहेत, त्यांच्यातील २ प्रकरण सोडून, बाकींच्या सर्व गुन्ह्यांची नोंद त्यांच्या काळात झाली आहे. अलीकडच्या वर्षात काहीही दाखल झालं नाही. आरडाओरड करण्यापेक्षा न्यायालयात जाण्यासाठी यांना कोण थांबवत आहे, असा सवाल अमित शाहांनी केला आहे.