जम्मू काश्मीर : कलम ३७० आणि ३५ए रद्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. यंदा पहिल्यांदाच अमित शहा काश्मीरमध्ये विजयादशमी साजरी करणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यामतून जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यापासून दूर राहावे, असा अप्रत्यक्ष संदेश पाकिस्तानला देण्यात आला आहे. त्यामुळे शहा यांचा काश्मीर दौरा खूपच महत्वाचा ठरणार आहे.
आपल्या दौऱ्यात शाह नियंत्रण रेषेला लागून असलेल्या राजोरी आणि बारामुल्ला येथे दोन सभांना संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काश्मीर आणि काश्मिरींच्या हितासाठी प्रयत्नशील आहे. काश्मीर मध्ये शांतता नांदावी,कलम ३७० हटवल्या नंतर राज्यात विकासाची गंगा वाहावी तसेच सर्व घटकांपर्यंत विकासाचा किरण पोहोचवण्यासाठी, हे सरकार कटीबद्ध आहे,असा संदेश या दौऱ्याच्या निमित्ताने शहा काश्मिरी लोकांना देत आहेत.
गृहमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावर आहे. या दौऱ्यात पहाडी परिसरातील लोकांचा एसटी दर्जात समावेश होण्याच्या घोषणे बबत लोक आशावादी आहेत. त्यामुळे दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाडी आणि गुर्जर बकरवालांच्या शिष्टमंडळाने शाह यांची राजभवनात भेट घेऊन, आपल्या मागण्या मांडल्या.
शहा काश्मीरमधील रॅलीद्वारे विरोधकांवर निशाणा साधू शकतात. ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये घडून आलेला सकारात्मक बदल. यामध्ये स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा फडकावण्याबरोबरच पर्यटकांची वाढती संख्या, रुपेरी पडद्यावर परतणे, सिनेमागृहे सुरू होणे, बॉलीवूडचे घाटीकडे आकर्षण अशा मुद्यांचा समावेश असू शकतो. सोबतच या दौऱ्यातून फुटीरतावाद्यांच्या अकार्यक्षमतेचा संदेशही अप्रत्यक्षपणे दिला आहे.
अतिरेकी समर्थक फुटीरतावाद्यांच्या नातेवाइकांना कामावरून काढून दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा या आधीच मोदी सरकारने दिलेला आहे. त्यामुळे इथूनपुढे दहशतवादी डोके वर काढणार नाहीत व खोऱ्यात शांतता नांदेल असा विश्वास, या दौऱ्या निमित्त शहा देत असल्याचे बोलले जाते.