एकनाथ शिंदेंसाठी अमित शाह यांचं मराठीतून ट्विट

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीतून ट्विट करून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना म्हटले आहे की, महाराष्ट्राचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तळागाळातील कष्टाळू नेता…महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते अनेक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही संपूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने राज्याच्या प्रगती आणि विकासाला गती देण्यासाठी कार्य करत आहात. तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं अमित शाह म्हणाले.