Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. बिग बी यांना आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची हार्टच्या समस्येमुळे नाही तर पायात क्लॉट झाल्यानं अँजिओप्लास्टी करण्यात आली, असं म्हटलं जात आहे.