मोठी बातमी! लोकसभेतून सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हे निलंबित

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह अन्य काही खासदारांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल संसदेतील ९२ खासदारांचे निलंबन झाले होते.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही फक्त संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर सरकारकडून उत्तर आणि सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत होतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण सरकार त्यापासून पळ काढत आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलीय.

आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावांचा समावेश आहे.

आज ४१ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत एकूण ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.