Maharashtra Politics : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. तसेच “ते उत्तम वक्ते आहेत. त्यांचं वत्कृत्व चांगलं आहे. उत्तम कलाकार आहेत. संभाजी महाराजांची भुमिका त्यांनी उत्तम पद्धतीने बजावली. पण काळजी करु नका. त्यांच्याविरोधात तिथे दिलेला उमेदवार निवडून आणूनच दाखवेन,” असे म्हणत अमोल कोल्हे यांना खुले आव्हानही दिले होते. दरम्यान, आता अमोल कोल्हेंकडून अजित पवारांना थेट प्रत्युत्तर दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. “खासगीतील गोष्टी सार्वजनिक झाल्यास पार्श्वभूमी देखील बाहेर येईल, असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे. तसेच अजित पवारांनी मला आव्हान देणे माझ्यासाठी गौरव आहे. तसेच, बात निकली तो दूर तक जाएगी असा इशारा देखील कोल्हे यांनी दिला आहे.
काय म्हणाले आहेत अमोल कोल्हे ?
अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्च्याची किल्ले शिवनेरीपासून सुरवात झाली आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजित दादांच्या आव्हानाचे कोणते ही दडपण नाही, असं मोर्चाचा शुभारंभ करताच स्पष्ट केले. चार दिवसांचा मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून आणि बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. याद्वारे अजित पवार त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत, असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोल्हे यांनी लगावला आहे.
तसेच “खासगीतील गोष्टी सार्वजनिक झाल्यास पार्श्वभूमी देखील बाहेर येईल, असा इशाराही कोल्हे यांनी दिला आहे. अजित पवारांनी मला आव्हान देणे माझ्यासाठी गौरव आहे. तसेच, बात निकली तो दूर तक जाएगी असा इशारा देखील कोल्हे यांनी दिला आहे.