Amol Shinde । साधेपणाने साजरा करणार वाढदिवस; जनतेला केलं आवाहन

#image_title

पाचोरा । पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचा १५ रोजी वाढदिवस साजरा होत आहे. आचारसंहितेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाचोरा शहरातील, रिलायन्स पेट्रोल पंप शेजारील, निवडणूक प्रचार कार्यालयात १५ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. आपल्या वाढदिवसाला कोणीही फुले, बुके, भेटवस्तू आणू नये, मतदानाच्या रूपातून भरभरून मिळणारे प्रेम हीच माझ्यासाठी जनतेची शुभेच्छा असेल, असे भावनिक आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी जनतेला केली.

महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. आणि पाचोरा भडगाव मतदार संघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. अशा परिस्थितीत माझा वाढदिवस साजरा होणे हा एक दुग्ध- शर्करा योग आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जनतेचा वचननामा जाहीर करण्यासाठी जनतेकडूनच काही समस्या व मागण्या यांची मागणी अमोल शिंदे यांनी समाज माध्यमांद्वारे केली होती. हजारो जनतेने आपली मते व समस्या पाठवल्या आहेत. त्या सर्व मागण्यांच्या आधारावर आपला वचननामा वाढदिवसाच्या निमित्ताने उद्याच आपण जाहीर करणार असल्याचे अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.