Amol Shinde । जाहीरनाम्यासाठी शिंदे यांचे मतदारसंघातील जनतेला आवाहन

पाचोरा । पाचोरा-भडगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी मतदार संघातील जनतेला आवाहन करत जनतेसाठी काय करावे हे जनतेच्या सूचनेनुसार जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले.

तसेच निवडणुकीत गाजावाजा करून जाहीरनामा प्रसिद्ध करायचा, निवडून आल्यावर तो जाहीरनामा विसरून केवळ स्वतःचाच विकास करायचा, अशा विचाराचा मी नाही, असेही शिंदे म्हणाले.

शेतकरी बांधवांच्या विविध समस्या निराकरना साठी व मालाला योग्य तो बाजार भाव मिळवून देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी, तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी, व्यापाऱ्यांच्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी, महिलांच्या स्वावलंबनासाठी व सुरक्षिततेच्या हमीसाठी मी काय काम करायला पाहिजे हे जनतेने सोबत दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर सुचवावे त्यामध्ये आपले प्रश्न, समस्या व भविष्यात अपेक्षित असलेल्या विकासात्मक उपाययोजना ही सर्व माहिती 8698811919 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी सोबत आपले नाव, गाव, मोबाईल नंबरदेखील पाठवावा असे आवाहन केले आहे.