पुण्यात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न, हे येशूचे रक्त म्हणून पाजलं…

पुणे : आळंदी मध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडा, येशूची पूजा करा असं सांगत.! येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी दिल्याचे आणि पूजा करायला सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. येशूंचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आळंदी मध्ये ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, येशू हे तुमचे देव आहेत. इतर देव घरातून बाहेर काढा, अशी एक महिला उपस्थितांना सांगत आहे. व्हिडिओमध्ये महिला काही प्रार्थना म्हणून दाखवते. तसेच त्यांच्याकडून म्हणवून घेतानाचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच छोटे-छोटे ग्लास ठेवण्यात आले आणि हे येशूंचे रक्त आहे, अशी संबंधित महिला सांगत आहे. हे रक्त प्या, मात्र ते रक्त नसून द्राक्षाचे पाणी असल्याचा आरोप तक्रारदारांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये केला आहे. तसेच त्यांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकरणाचा तपास आळंदी पोलीस करत आहे. नेमका हा काय प्रकार आहे. व्हिडीओमधून हा धर्मपरिवर्तनाचे प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्यांच्याकडून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न होत होता. त्यांना त्याठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न होत होता. आम्ही संबंधित परिवाराशी बोललो आहे. तुम्ही येथून निघून जा, असे धर्मपरिवर्तन करणारी महिला म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.