तरुण भारत लाईव्ह । ३० जानेवारी २०२३। सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी पालक शिक्षक सभेच्या सुरुवातीला संगीत शिक्षकांनी सुरेल प्रार्थना सादर केली त्यानंतर प्राथमिक विभागातील मधुश्री मदाने यांनी कार्यक्रमाची सुरुवात करून पालकांचे स्वागत केले. सभेबद्दल माहिती दिली त्यानंतर काही महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा आणि धोरणात्मक निर्णय या सभेत घेण्यात आले. इयत्ता पहिली पासून ते दहावीपर्यंतचे वयानुसार त्यांचे बौद्धिक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न शंका त्यांच्या समस्या पालक तसेच शिक्षक यांनी ओळखून विद्यार्थ्याला बोलते करून त्यावर उपाययोजना कशी अमलात आणावी मुलांना स्व अध्ययन देण्याची महत्त्व समजावून सांगणे तशी कृती करणे नियोजन करून स्वतःचं विद्यार्थ्याने सेल्फ स्टडी स्व अध्ययन कसे करावे का करावे त्यामागील हेतू त्यांचा फायदा परीक्षेच्या काळात मुलांना येणाऱ्या ताण तणाव दूर कसा केला जाईल यावर चर्चा केली.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक मांडण्यात आले लहान मुलांचे वय लक्षात घेऊन त्यांना शिकवण दिली पाहिजे वयाचे विचार लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या मुलांकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. मुलांना खेळाच्या माध्यमातून आवडीनुसार त्यांना शिकवण दिली पाहिजे. प्राचार्यांनी या विषयावर चर्चा केली विद्यार्थ्याला शाळेत शिकवलेली पद्धत आणि बाहेरील क्लास यातील पद्धत यात फरक काय असतो शाळेव्यतिरिक्त क्लास शिकवणी ची आवश्यकता नसून विद्यार्थ्याने रोज शाळेत शिकवलेले मुद्दे लक्षात घेऊन नियोजन पूर्ण घरी व अध्ययन करणे का गरजेचे आहे याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्याला अभ्यासातील समस्या काय याबद्दल विचारले पाहिजेत संवाद साधला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्व अध्ययन कसे करावे, का करावे ,त्याचा फायदा काय हे विद्यार्थ्याला समजावून सांगणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली स्व अध्ययनातून विद्यार्थ्याला स्वतःच्या उनिवा स्वतः शोधून त्यावर उपाययोजना स्वतःला कशा करता येईल यावर प्राचार्यांनी चर्चा केली विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा पालक शिक्षक यांनी कशी निर्माण करायची विद्यार्थ्यांमध्ये सध्या परिस्थिती ताण तणाव जास्त वाढत आहे विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्या मनातील प्रश्न शंका यांचा एकंदरीत केस स्टडी करून पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे यातून मुलांचा अभ्यासातील ताण कमी होईल स्व अध्ययन करून स्वतःच्या उणिवा स्वतः शोधून त्यावर उपाय योजना स्वतः विद्यार्थ्याला ही जमले पाहिजे यासाठी मुलांना जे शिकवले गेले त्याचे परीक्षण करून स्वतः ते ज्ञान समजून आत्मसात केले पाहिजेत अशा पद्धतीने अभ्यासाचे नियोजन केल्याने कोणत्याच विद्यार्थ्याला क्लास लावण्याची गरज पडणार नाही शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत त्यांच्या प्रश्नांवर समस्येबाबत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सुरू असलेले उपक्रम आणि आगामी काळात आखलेल्या नवनवीन धोरणा संदर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये पालकांकडून देखील काही संकल्पना आणि विचार मांडण्यात आले. या सूचना आणि विचारांचे स्वागत करत त्यावर विचार करून अंमलबजावणी केली जाईल याची ग्वाही दिली. त्यांच्या समस्या समजून त्यावर कोणती योजना करावी हे आदरणीय प्रा.श्री.ज्ञानेश्वर पाटील सर यांनी सांगितले. अतिशय सकारात्मक दृष्टीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि धोरणात्मक निर्णय घेणारी महत्त्वपूर्ण अशी ही पालक शिक्षक संघाची सभा संपन्न झाली सह प्राथमिक विभागातील मधु श्रीमदाने यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रत्नमाला पाटील माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सविता कुलकर्णी यांच्यासह कार्यकारी सदस्य उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.