तरुण भारत लाईव्ह । १० मे २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. कधी कधी गोचर कालावधीत शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होते. १३ मे २०२३ रोजी चंद्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनि ग्रह असल्याने विष योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला गेला आहे. चंद्र ग्रह 13 मे रोजी शनिवारी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत चंद्र १५ मे २०२३ रोजी पहाटे 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सव्वा दोन दिवस काही राशींसाठी अडचणीचे ठरतील. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
कर्क
या राशीच्या अष्टम स्थानात विषयोग तयार होत आहे. . खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याची या काळात काळजी घ्या. गुंतवणूक या काळात करणं टाळा. तसेच वाहन देखील सावकाशपणे चालवा.
कन्या
या राशीच्या षष्टम स्थानात विषयोग तयार होत आहे. वाद टाळण्याचा प्रयत्न या काळात करा. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्या. विनाकारण पैसा खर्च करू नका. न्यायालयीन प्रकरणात अपयश हाती पडू शकतं.
मीन
या राशीच्या बाराव्या स्थानात विषयोग तयार होत आहे. यामुळे या काळात अचानक प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान तुमचा वाद होऊ शकतो. तसेच सामान चोरी होण्याचं भय राहील.