Anantnag : लष्कर घेताय हौतात्म्याचा बदला, ड्रोनमधून पळताना दिसले दहशतवादी, तीन ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू केली आहे. लष्कराने गेल्या शनिवारपासून बारामुल्ला येथील जंगलाला वेढा घालून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. युरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न आज सकाळी सतर्क लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. 2 दहशतवादी मारले गेले आणि त्यांचे मृतदेह सापडले, तिसरा दहशतवादी मारला गेला पण LOC वर पाकच्या चौक्याने केलेल्या गोळीबारामुळे मृतदेह काढण्यात अडथळे आले.

पीर पंजाल ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर पीएमएस ढिल्लन म्हणाले की, “विशिष्ट माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत, घुसखोरीचा प्रयत्न आज पूर्णपणे उधळण्यात आला.”

ते म्हणाले की, जेव्हा 3 दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सतर्क जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार मारले आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, 3रा दहशतवादी मारला गेला परंतु नियंत्रण रेषेवरील आसपासच्या भागात पाकच्या चौक्यांकडून गोळीबार केल्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास अडथळे आले.

शनिवारी सकाळपासून बारामुल्लामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून जंगलात शोधमोहीम सुरू आहे. शनिवारी सकाळी ही कारवाई यशस्वी झाली असून तीन दहशतवादी मारले गेले.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या ऑपरेशनची कमान घेतली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र लष्कराच्या जवानांनी त्या दहशतवाद्यांना ठार केले. दरम्यान, तेथे दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामुल्ला पोलिस आणि भारतीय लष्करासोबत उरी भागात दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना पोलिसांनी घेरले आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये चौथ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा भाग घनदाट जंगल आणि पर्वतांनी वेढलेला आहे. जंगल आणि पर्वत असल्याने दहशतवाद्यांना लपणे सोपे जात आहे.

लष्कर कमांडर उझैर खानचा घेत आहेत शोध
मात्र, लष्कर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. काश्मीर झोनचे एडीजीपी यांचे वक्तव्य आले आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून राहू शकतात. एकही दहशतवादी सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ते मारले जातील. जर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बॉम्बफेक करून दहशतवादी नष्ट केले जातील.

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराकडून बॉम्बफेकही केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. लष्कर कमांडर उझैर खान याच्यासोबत या जंगलांमध्ये एक खतरनाक दहशतवादी लपून बसला असल्याची माहिती एका उच्च लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे. या दहशतवादी हल्ल्यात मेजर आशिष धोनक, कर्नल मनप्रीत सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट शहीद झाले होते. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.