मुंबई : आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष उडण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याला ओबीसी समाजातून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे आरक्षणाचा संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेण्यास तीव्र विरोध केला आहे. आमचा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध आहे. त्यांना ओबीसींमध्ये घेऊ नये. तसेच त्यांना ओबीसींची प्रमाणपत्रेही देऊ नये. नाही तर आम्ही देशभर आंदोलन छेडू, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
तर कोर्टात जाऊ
जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन करू. सरकारने दबावात येऊन मराठ्यांना ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशाराच बबनराव तायवाडे यांनी सरकारला दिला आहे.