तरुण भारत लाईव्ह । श्रीशा वागळे । ऑस्कर पुरस्कार मिळाला की, प्रत्येक कलाकाराला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. ऑस्करच्या व्यासपीठावर बरेच काही घडत असते. हा एक जागतिक सन्मान असतो. ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, माहितीपटांना जगभरात वेगळी ओळख मिळते. ऑस्कर पुरस्कारप्राप्त कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक असतात. natu natu song oscar या कलाकृती उत्कृष्ट असतात, दर्जेदार असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी वेगळा ठरला. विशेषत: भारतीय मनोरंजनविश्वाला या ऑस्कर सोहळ्याने बरेच काही मिळवून दिले. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारत इतिहास घडवणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि घडलेही तसेच! natu natu song oscar ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच दोन विभागांमध्ये पुरस्कार मिळाले. मुळात यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारतीय कलाकृतींना तीन विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. असे पहिल्यांदाच घडले होते.
natu natu song oscar आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब तसेच अन्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावत आधीच इतिहास घडवला होता. या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल साँग या विभागात नामांकन मिळाले होते. यासोबतच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या विभागात नामांकन होतं. natu natu song oscar सोबतच ‘ऑल दॅट ब्रीद्स’ या माहितीपटाला डॉक्युमेंट्री फीचर फिल्म या विभागात नामांकन होते. भारताला ‘नाटू नाटू’कडून खूप अपेक्षा होत्या. या गाण्याला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित भारतीयांमध्ये उत्साह संचारला. प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून आली. हा क्षणच खूप खास होता. natu natu song oscar यासोबतच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने कमाल केली. या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर मिळाला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. भारताला पहिल्यांदाच दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले.
natu natu song oscar ‘नाटू नाटू’ हे ऑस्कर पुरस्कार मिळविणारे भारतीय चित्रपटातील पहिलेच गाणे ठरले आहे. याआधी २००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’मधल्या ‘जय हो…’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ पुरस्कार मिळाला होता. ‘स्लमडॉग मिलेनियर’ला भारताची पृष्ठभूमी असली, तरी हा ब्रिटिश चित्रपट होता. natu natu song oscar मात्र, यावेळी ‘आरआरआर’ या अस्सल भारतीय चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या अस्सल भारतीय गाण्याचा ऑस्करच्या मंचावर सन्मान झाला आहे. हा भारताचा सन्मान आहे, भारतीय मनोरंजन क्षेत्राचा सन्मान आहे. ‘नाटू नाटू’ने याआधी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला होता. हा पुरस्कार पटकावणारे ‘नाटू नाटू’ हे पहिलेच भारतीय आणि आशियाई गाणे ठरले होते. natu natu song oscar ‘नाटू नाटू’च्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. या गीताचे संगीतकार एम. एम. किरवानी यांना एकेकाळी अकाली मृत्यूची भीती वाटायची. याच कारणामुळे त्यांनी जवळपास दीड वर्षं संन्यास घेतला होता. इतकेच नव्हे, तर त्यांचा मुहूर्त बघण्यावरही प्रचंड विश्वास आहे. प्रत्येक काम ते मुहूर्त बघूनच करतात. अगदी मुहूर्त बघितल्याशिवाय ते गाडीतूनही उतरत नाहीत.
‘नाटू नाटू’ या गाण्यावर आज सगळे जग थिरकतेय. natu natu song oscar या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन वाटते तितके सोपे नव्हते. या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित एकेकाळी आत्महत्या करणार होता. या गाण्यातल्या ‘हुक स्टेप’साठी रक्षितने ११० स्टेप्स तयार केल्या होत्या. ‘नाटू नाटू’ हे मैत्री भावनेवर आधारित गाणे आहे. हे गाणे तब्बल १९ महिन्यांच्या मेहनतीतून साकारले आहे. गीतकार चंद्रबोस यांनी या चित्रपटासाठी २० गाणी लिहिली होती. त्यापैकी फक्त ‘नाटू नाटू’ या गाण्याची निवड करण्यात आली. या गाण्याचा ९० टक्के भाग फक्त अर्ध्या दिवसात लिहिण्यात आला होता. natu natu song oscar मात्र, उर्वरित १० टक्के गाणे पूर्ण करण्यासाठी १९ महिन्यांचा कालावधी लागला. ‘नाटू नाटू’च्या नृत्य दिग्दर्शनासाठी दोन महिने लागले होते. या गाण्याचे चित्रीकरण युक्रेनच्या अध्यक्षांच्या महालात झाले होते. या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी तब्बल २० दिवस लागले होते. हे मूळ तेलुगू गाणे असून त्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. हिंदीत ‘नाटू नाटू’ म्हणजे ‘नाचो नाचो.’ natu natu song oscar ब-याच परिश्रमांती हे गाणे तयार झालेय. या गाण्याचा जन्मच मुळी इतिहास घडवण्यासाठी झाला असावा, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
तिकडे ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटानेही ऑस्कर गाजवला. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा भारतीय-अमेरिकन लघुमाहितीपट आहे. यात एका जोडप्याची आणि हत्तीच्या पिल्लाची कथा दाखवण्यात आली आहे. दक्षिण भारतीय जोडपं अनाथ झालेल्या रघू नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा सांभाळ करतं. या प्रवासात या दोघांमध्ये अनोखे बंध निर्माण होतात. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ही माणूस आणि प्राणी यांच्यातल्या बंधाची कथा आहे. natu natu song oscar आदिवासी समाज निसर्गासोबत कशा पद्धतीने मिळून-मिसळून राहतो, हे दाखवण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करण्यात आला आहे. हा माहितीपट फक्त माणूस आणि प्राणी यांच्यातले बंध यांची कथा सांगत नाही तर निसर्गाप्रती आदर दाखवणा-या भारतीय संस्कृतीचीही झलक दाखवतो. याच कारणामुळे हा माहितीपट वेगळा ठरतो. natu natu song oscar कार्तिकी गोन्स्लाल्विसने या माहितीपटाचं दिग्दर्शन केले आहे. ही तामिळनाडूमधल्या मुदुमलाईच्या जंगलातली कथा आहे. कार्तिकीने या माहितीपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि पहिल्याच माहितीपटाद्वारे ऑस्करचे मैदान गाजवले.
natu natu song oscar कार्तिकी यांनी काही काळ या रघूसोबत घालवला आहे. त्यांनी रघूला मोठे होताना पाहिले आहे. त्यांचेही या रघूसोबत वेगळे बंध जुळले आहेत. आसाम, केरळ, तामिळनाडू भागातल्या हत्तींचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यातच भयंकर दुष्काळ पडल्यानंतर हत्ती अन्नपाण्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. मानवी वस्तीत जातात. इथे अपघातात त्यांचा मृत्यू होतो. काहींना शॉक बसतो तर काहींना विषही दिले जाते. या हत्तींची पिल्लं अनाथ होतात. ही अत्यंत हृदयद्रावक अशी परिस्थिती आहे. अशाच अनाथ रघूला त्याचे हक्काचे घर मिळाले. पण असे अनेक रघू या भागात आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही. natu natu song oscar दरम्यान, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बरेच काही पहिल्यांदा घडत होते. भारताला दोन विभागांमध्ये पुरस्कार मिळालाच; शिवाय दीपिका पदुकोणला ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्कर सोहळा म्हटला की, आपल्याला ‘रेड कार्पेट’ आठवतं. रेड कार्पेटवरून चालत येणा-या सेलिब्रिटी हे वर्षांनुवर्षाचे चित्र यंदा बदलले. natu natu song oscar यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात शॅम्पेन रंगाचे कार्पेट घालण्यात आले होते.
यंदाचा ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होता. मागील ६२ वर्षांपासून ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेट अंथरले जात असे. अर्थात यामागचे नेमके कारण मात्र सांगण्यात आले नव्हते. अनेक रंगांमधून शॅम्पेन रंगाची निवड करण्यात आली.natu natu song oscar यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नेहमीप्रमाणे तारेतारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. लेडी गागा ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसली. यंदाच्या सोहळ्यात ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर अॅट ऑल वन्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ब्रँडन फ्रेझर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर मिशेल येओहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. natu natu song oscar याआधीही भारतीयांनी ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. भानू अथय्या ही ऑस्कर पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय व्यक्ती. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांसाठी पोशाख डिझाईन केले. यात प्यासा, गाईड, लगान यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
natu natu song oscar रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ या चित्रपटासाठी भानू अथय्या यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्करच्या मानद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साऊंड डिझायनर रेसूल पोकुट्टी यांनी २००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. ए. आर. रेहमान यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’मधल्या ‘जय हो…’ गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता. natu natu song oscar गुलजार यांनाही ‘जय हो’ या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यानंतर आता ‘नाटू नाटू’ या भारतीय गाण्याचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा माहितीपटही आहेच. आज भारताचा दबदबा सर्वच क्षेत्रांमध्ये वाढत आहे. natu natu song oscar ऑस्करचे व्यासपीठही भारतीयांनी गाजवले आहे. natu natu song oscar येत्या काळात भारतीय चित्रपटाला, दिग्दर्शकांना मानाचा ऑस्कर मिळेल आणि भारतीय चित्रपट जागतिक चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी छाप सोडतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.