Andhra Pradesh Crime News : सध्या ओयो (OYO) ही ऑनलाइन रुम बुकिंग सेवा देशभर चर्चेत आहे. ओयोच्या रुम्स आता प्रत्येक मोठ्या शहरात सहज उपलब्ध असून, शहरात येणाऱ्या नव्या प्रवाशांसाठी तसेच विविध कार्यक्रमांच्या कलप्ससाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मात्र, आंध्र प्रदेशच्या राजधानी हैदराबादमधील ओयो रुममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. जिथे, एका जोडप्याने केलेला कांड पाहून पोलिसही चक्रावले असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
देवेंद्र राजू आणि संजना मांजा यांचा भयंकर कट पोलिसांसमोर आला. देवेंद्र राजू हा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रहिवाशी आहे, तर संजना मांजा मध्य प्रदेशातील आहे.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
दोघांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली आणि ते एकत्र राहत होते. त्यांना ऐश्वर्यशाली जीवन जगायचं होतं, त्यासाठी त्यांनी ओयो रुम्सचा वापर करून गांजा विक्री सुरू केली.
सुरुवातीला ओयो रुममध्ये राहून ते गांजा विकत होते. त्यांच्या अनेक रुम बुकिंग्समुळे पोलिसांना संशय आला, ज्यामुळे त्यांनी तपास सुरू केला. एसटीएफ पथकाने शुक्रवारी रात्री कोंडापूरमधील ओयो रुमवर छापा टाकला आणि त्यांना रंगेहाथ पकडले.
तपासणीत आरोपींनी सांगितलं की, ते ओयो रुममध्ये गांजा विक्री करत होते. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. एसटीएफ पोलिसांना याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ओयो रुम्सच्या वापराच्या बाबतीत चिंताजनक प्रश्न उभा राहिला आहे, आणि या प्रकारच्या घटनांमुळे या सेवा वापरणाऱ्या लोकांना सुरक्षिततेबाबत शंका येण्याची शक्यता आहे.