---Advertisement---
सावदा (प्रतिनिधी) : शहरातील सोमेश्वर नगरात पथदिवे, रस्ते, स्वच्छता आदी मूलभूत समस्या आहेत. मात्र, त्या सोडविण्यात येत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज मंगळवारी (१ जुलै) रोजी नगर पालिकेस कुलूप ठोकले. दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी भेट देऊन संबंधित समस्यांवर मार्गकाढू, अशी समजूत घातल्याने कुलूप उघडण्यात आले.
---Advertisement---
सोमेश्वर नगरात पथदिवे लागले असले तरी ते सुरू होत नाही. अमृत योजनेचे काम सुरु असल्यामुळे रस्ते चिखलमय झालेले आहे. गटारी साफ होत नाही. कचरा साचलेला असतो, आदी समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत पालिकेत वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज मंगळवारी (१ जुलै) रोजी नगर पालिकेस कुलूप ठोकले.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी येथे भेट देऊन नागरिकांचे प्रश्न लक्षात घालते. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू, पण पालिकेला ठोकलेले कुलूप योग्य नाही. आपल्या पालिकेचा इतिहास आहे, त्यास धक्का लागता काम नये, अशी भूमिका घेतली. आपण मुख्याधिकारी भूषण वर्मा तसेच प्रशासक प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याशी बोलू, या समस्यांवर मार्ग काढूका, अशी समजूत घातल्यावर कुलूप उघडण्यात आले. यावेळी पालिका कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी यांना निवेदन देऊन दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.