Video : प्रेयसीचा हात धरून हॉटेलमधून बाहेर आला पती; संतापलेल्या पत्नीने थेट…, पाहा नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

Extramarital affair : पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीने जाब विचारणं हे साहजिकच आहे. पण तीच गोष्ट वारंवार होत असेल कुठल्याही व्यक्तीचा राग अनावर होतो. मग त्यानंतर जे घडत जे भयानक असतं… अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे पत्नीने प्रेयसीसोबत बाहेर फिरणाऱ्या पतीला रंगेहात पकडले आणि त्याच्या मैत्रिणीला भररस्त्यात धू धू धुतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलीस सूत्रानुसार, महिलेचे म्हणणे आहे की तिचे लग्न २०१८ मध्ये झाले होते आणि तिला तीन मुले आहेत. तिचा पती दोन दिवसांपूर्वी दिवाळीसाठी घरी परतला होता. मंगळवारी सकाळी तो त्याच्या कथित प्रेयसीला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेला होता. संशयास्पदरित्या, पत्नी देखील हॉटेलमध्ये गेली. तिने तिचा पती त्याच्या प्रेयसीसोबत हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिला, ज्यामुळे ती संतापली.

महिलेने म्हणणे आहे की, तिचा पती गेल्या तीन वर्षांपासून महिलेशी प्रेमसंबंधात होता आणि तिने त्यांना अनेक वेळा रंगेहाथ पकडले होते. हॉटेलबाहेर दोघांमध्ये वाद झाले आणि त्याने रूपांतर मारहाणीत झाले.

महिलेने केवळ पतीच्या प्रेयसीला मारहाण केली नाही तर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीलाही चापट मारली. यावेळी दोन्ही महिलांनी एकमेकांचे केस ओढले. रस्त्यावरील गोंधळ पाहण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्यांची गर्दी जमली. काहींनी तर घटनेचे चित्रीकरणही केले.

आश्चर्य म्हणजे, घटनास्थळी असलेले पोलिस अधिकारी मूक दर्शक राहिले. सुमारे एक तास चाललेल्या गोंधळानंतर, रस्त्यावरून जाणाऱ्यांनी हस्तक्षेप केला, परिस्थिती शांत केली आणि पतीला हाकलून लावले.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली असून, या प्रकरणात अद्याप कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही. व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू असून, तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

https://public.app/video/sp_h6fyeg4f5cdfo

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---