---Advertisement---

निमगव्हाण येथील अनिल बाविस्कर यांना शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार 

---Advertisement---

निमगव्हाण : येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवाजी बाविस्कर यांना शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने २०२३ – २४ वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात पोलीस ग्राउंड पालकमंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

राज्य शासनाच्या वतीने युवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने युवा पुरस्कार दिला जातो. पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, कला, क्रीडा, सांस्कृतिक, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, युवा विकास या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment