---Advertisement---

Anil Deshmukh : अजितदादा गटाच्या तिकीटावर लढणार… नेमकं काय म्हणाले?

---Advertisement---

Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कटोलमधून अजितदादा गटाच्या तिकीटावर लढणार आहेत. असा दावा अजितदादा गटाचे प्रशांत पवार यांनी केला आहे. प्रशांत पवार यांच्या या दाव्यावर अनिल देशमुख यांनी विधान केलं आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख? 

मीडियाशी संवाद साधताना अनिल देशमुख म्हणाले की, प्रशांत पवारला समजायला पाहिजेत, दुनियेला माहितीय की, मी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा आणि शेवटपर्यंतसोबत राहणारा आहे. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. सगळ्यांना माहितीय मी शरद पवार साहेबांचा खंदा समर्थक आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. देशमुख यांनी शरद पवार यांच्या गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केल्याने नागपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कटोलची जागा भाजप स्वत:कडे ठेवणार की अजितदादा गटाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment