..तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल, पवारांच्या निर्णयानंतर अनिल पाटलांचा इशारा

Politics Maharashtra : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकर्त्यांना हा निर्णय मान्य नाहीय. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी देखील त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल” असा इशारा दिला आहे.

काय म्हणाले अनिल पाटील?
“शरद पवारांनी त्यांच म्हणणं आज सर्व कार्यकर्त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांच्या या निर्णयाशी देशभरातील कार्यकर्ते सहमत नाहीत. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी आणि शरद पवार हे नाव एकमेकांशी जोडलेलं आहे”

“आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत ते आपला निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत त्याचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करु. शरद पवारांनी आपल्या दृष्टीकोनातून निर्णय घेतला आहे. त्यांच्या वयाच्या दृष्टीनं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण जोपर्तंय ते आहेत तोपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील हा आमचा निर्णय आहे. पण जर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल”

https://twitter.com/i/status/1653336912726487040