अमळनेर । राज्यात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. अवघ्या २० दिवसांवर निवडणूक आली असून प्रचारासाठी केवळ १५ दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अमळनेर मतदार संघात महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
मंत्री अनिल भाईदास पाटील म्हणजे विकासाचे एक व्हिजन
मंत्री अनिल भाईदास पाटील म्हणजे विकासाचे एक व्हिजन असलेलं नेतृत्व आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे जवखेडा गाव असेल किंवा आजूबाजूची गावे असतील सर्वांनीच भरभरून मतदान केल्याने त्यांनीदेखील विकासकामांच्या रूपानेच त्याची परतफेड केल्याने यंदा जवखेडा पंचक्रोशीतील जनता पुन्हा त्यांना कौल देतील, असा विश्वास जवखेडा येथील माजी सरपंच तथा विकास सोसायटीचे चेअरमन श्यामकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या संदर्भात त्यांनी अधिक बोलताना सांगितले की, अनिल पाटील यांचेसारखे अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व अमळनेरच्या जनतेला आमदार म्हणून लाभलं हे खरोखरच आम्ही आमचे भाग्य सम जतो. गेल्या पाच वर्षांत जवखेडा गावात भरभरून विकासकामे देऊन अनेक प्रश्न अनिल पाटील यांनी सोडविले आहेत.
गावात पाणी मुबलक होते पण गावठाण फिडरवरून वीज घ्यावी लागत असल्याने लोड वाढून नेहमीच पाण्यासाठी बोंबाबोंब होत होती. परंतु अनिल पाटील यांनी नवीन डीपी मंजूर केल्याने विजेचा प्रश्न सुटून पाण्याची तक्रारच गावाची मिटली आहे.
तसेच नवलनगरला जोडणारा रस्ता केल्याने धुळ्याकडे जाणारा शॉर्टकट मार्ग झाला आहे. जवखेडासह वावडे, आरडी, आनोरे, पिंपळे यासह इतर गावांमध्ये देखील पाणीपुरवठा योजना असेल, रस्ते, स्मशानभूमी, संरक्षण भिंत, ग्रा. पं. इमारत, शेत रस्ते अशी अनेक विकासाभिमुख कामे झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.