Anmol Bishnoi । अनमोल बिश्नोईला भारतात आणता येईल का ? जाणून घ्या काय करतेय भारतीय एजन्सी ? 

#image_title

Anmol Bishnoi । गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई याला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले. तेव्हापासून त्याला भारतात परत आणण्याची चर्चा आहे. मात्र, खरच त्याला भारतात परत आता येईल का, याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे ? हे जाणून घेऊया… 

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई यांचेही नाव पुढे आले आहे. यानंतर मुंबई पोलीस अनमोलचे लोकेशन ट्रॅक करत होते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स आणि अनमोल या भावांना वाँटेड घोषित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले असून त्यात लॉरेन्स आणि अनमोल आरोपी आहेत.

इंटरपोलच्या माध्यमातून अनमोलविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. अनमोल बिश्नोई कॅलिफोर्नियामध्ये असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना देण्यात आली होती. यानंतर आता भारत अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची चर्चा करत असून अनमोलला भारतात कधी आणले जाईल याची सर्वत्र चर्चा आहे, मात्र सध्या तरी अनमोलला भारतात आणणे शक्य दिसत नाही. मात्र, अनमेल बिश्नोईला भारतात वाँटेड घोषित करण्यात आले असले तरी, अमेरिकेत अनमोलवर कोणताही गुन्हा दाखल नाही.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर रात्री उशिरा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दीकीच्या मृत्यूनंतर एक पोस्टही व्हायरल झाली होती ज्यामध्ये हॅशटॅगसोबत लॉरेन्स बिश्नोईही लिहिले होते. बाबा सिद्दिकीच्या मृत्यूनंतर पोलिस लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहेत. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनमोलला लॉरेन्स गँगमध्ये छोटे गुरुजी म्हटले जाते. अनमोल त्याच्या मोठ्या भावापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. वयाच्या 25 व्या वर्षी अनमोल अमेरिका, अझरबैजान, कॅनडा, केनिया, UAE, पोर्तुगाल आणि मेक्सिको व्यतिरिक्त भारतात 1000 हून अधिक नेमबाजांना ऑपरेट करत आहे.