‘उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार’, पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ

---Advertisement---

 

जळगाव : अडचणीत असलेल्याना पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ नंबरवर डायल केल्यास त्यांना तात्काळ मदत केली जाते. सर्वसामान्यांना पोलिसांची जेव्हा आवश्यकता लागेल आणि त्यांना पोलीस स्टेशनला प्रत्येक्ष येऊन फिर्याद देणे शक्य नसेल अशा व्यक्तींकरिता ११२ नंबरची सुविधा पुरविण्यात येत असते. ११२ नम्बरवर संपर्क साधला असता कित्येकांना मदत मिळत असते. मात्र, या सुविधेचा गैरवापर करून खोटी माहिती दिल्याने पाचोरा पोलीस स्टेशमध्ये किरण लक्ष्मण पाटील (वय २८, रा. कृष्णापुरी ता. पाचोरा) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण पाटील याने ११२ या क्रमांकावरून ‘उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार आहे, पोलीस मदत हवी आहे’ अशी खोटी माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार ( २७ऑगस्ट) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कॉन्स्टेबल शरद पाटील हे कर्तव्यावर होते.

यावेळी किरण पाटील याने त्याच्या मोबाईल नंबरवरून फोन करून सांगितले की, उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार आहे. पोलीस मदत हवी आहे. यानंतर पोलीस यंत्रणेद्वार सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत सत्य समोर आले. या चौकशीत किरण हा खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने खोटे बोलून पोलिसांची दिशाभूल केल्याचे आढळून आले.

त्यामुळे पाचोरा पोलीस स्टेशन येथे किरण लक्ष्मण पाटील याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान ११२ क्रमांकावर खोटी माहिती देणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---