धक्कादायक! जळगावात आणखी एका अस्थीची चोरी, एकाच आठवड्यात दुसरी घटना

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील मेहरून स्मशानभूमीतून एका वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेला आठवडा होत तोच पुन्हा एका महिलेच्या अस्थी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, झालेल्या या प्रकारामुळे महिलेच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील जिजाबाई पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर शिवाजीनगर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला होता.

दरम्यान, आज सकाळच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता त्यांना स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह अस्थी नसल्याचं निर्धार निदर्शनास आले.

अशीच एक घटना आठवड्यापूर्वी मेहरून स्मशानभूमीत देखील घडली होती, मात्र एका आठवड्यात ही दुसरी घटना असून पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन अजूनही झोपलेले आहे का? असा सवाल नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

धक्कादायक! ‘स्मशानातील सोन्या’च्या हव्यासापोटी अस्थीची चोरी, जळगावातील प्रकार

मयत जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गायब केले असून, यामुळे नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मैदाच्या भीतीने अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी पंचपकवान असलेले भोजनाचे पान ठेवण्यात आल्याचं आढळलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणात मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन या घटनेबाबत नागरिकांच्या मनात संताप असल्याचे पाहायला मिळत आहे.

आमदार सुरेश भोळे आयुक्तांना विचारणार जाब

दरम्यान, मनपावर आमदार सुरेश भोळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवण्याबाबत आधीच मनपा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप काम झालेलं नाही. त्यामुळे आज सोमवारी याबाबत मनपा आयुक्त यांना जाब विचारणार असल्याचे आमदार भोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---