---Advertisement---

पत्नी असतानाच घरात आणली दुसरी महिला; नंतर काय घडलं ?

---Advertisement---

नंदुरबार : घरात दुसरी महिला आणून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी माजलगाव, जि. बीड येथील दोन जणांविरुद्ध नवापूर पोलिसात विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, करंजी बुद्रुक, ता. नवापूर येथील एलिशा गावित (२८) यांचा विवाह भाटवडगाव, ता. माजलगाव येथील अनिल विच्या गावित यांच्याशी २०१८ मध्ये झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी प्रेमसंबंधातून अनिल याने घरात शेख मिनल हुसेन या महिलेला आणले.

याबाबत एलिशा यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता एलिशा यांचा छळ सुरू झाला. मारहाण, शिवीगाळ करण्यात येऊ लागली. शेख मिनल यांनीही अनिल यांना छळ करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अखेर एलिशा यांनी नवापूर पोलिसात फिर्याद दिल्याने अनिल गावित (३२), शेख मिनल हुसेन (२७) रा. भाटवडगाव, ता. माजलगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कर्मचारी भटू माळवे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment