तरुण भारत लाईव्ह । २४ मे २०२३। टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी येत आहे. अनुपमा’ मालिकेत धीरज कुमारची भूमिका साकारणारे अभिनेते नितेश पांडे यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीजवळ शूटिंगसाठी गेले होते. मंगळवारी(२३ मे) रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. नितेश पांडे यांच्या पत्नीचा भाऊ व निर्माता सिद्धार्थ नगर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
नितेश यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.