इन्स्टंट डाळींचे आप्पे, घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह । २९ जानेवारी २०२३। सकाळच्या वेळेला नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पौष्टिक नाश्ता रोज केला पाहिजे. नाश्ता केल्याने दिवसभर एनर्जी राहाते. सगळ्या डाळींनी बनवला जाणारे आप्पे हा पदार्थ पौष्टिक आणि बनवायला सुद्धा सोप्पं आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो. हे जाणून घ्या तरुण भारताच्या माध्यमातून.

साहित्य
2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे

कृती
सर्वप्रथम तांदूळ आणि दोन्ही डाळी मेथी दाण्यासह वेगवेगळे भिजवून ठेवा. . नंतर तांदूळ, डाळी मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. वाटलेलं मिश्रण रात्रभर उबदार ठिकाणी ठेऊन द्यावे. पीठ फरमेन्ट झाल्यानंतर त्यात पाणी आणि मीठ घालावे, आप्प्या मध्ये बऱ्याचदा हिरवी मिरची बारीक करून, बारीक चिरलेला कांदा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालतात. त्यात थोडे तेल घालून घ्यावे. गॅस वर आप्पे पात्र ठेऊन थोडं गरम झाल्यानंतर त्यात प्रत्येक साच्यात तेल टाकून घ्यावे. चमच्याने त्या प्रत्येक साच्यात पीठ घालावे, त्यावर ही थोडं तेल सोडावे. आणि झाकण ठेवावे. आप्पे एक बाजूने नीट झाल्यावर ते चमच्याने काळजीपूर्वक उलटावे. उलटताना काटा चमचा वापरा म्हणजे भाजनार नाही. दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजल्यानंतर सगळे आप्पे एकेक करून काढून घ्या.